Fri, Sep 18, 2020 21:59होमपेज › National › राहुल गांधींकडून पीएम मोदींना टोले सुरुच!

राहुल गांधींकडून पीएम मोदींना टोले सुरुच!

Last Updated: Sep 16 2020 10:20AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरस दरम्यान भाजपने सरकारने एकापेक्षा एक नुसताच पुलाव शिजवल्याचे म्हटले आहे.  त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, २१ दिवसात कोरोनाला पराभूत करण्याचे पॅकेज, आरोग्य सेतू ॲप सुरक्षा करेल, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, घुसखोरी कोणी केलीच नाही, स्थिती नियंत्रणात आहे. परंतु एक संधीही होती संकटात संधी.

मंगळवारी राहुल गांधींनी परप्रांतीय मजुरांच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. लॉकडाऊनमध्ये सर्वांनीच मजूरांचा मृत्यू होताना पाहिला, पण सरकारला त्याची माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले होते.  ट्विटमध्ये म्हटले होते की, लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी कामगार मरण पावले आणि किती रोजगार गेले हे मोदी सरकारला माहिती नाही. तुम्ही मोजले नाहीत म्हणून मृत्यू झाला नाही? तुमने ना गिना तो क्या मौत ना हुई? हां मगर दुख है सरकार पे असर ना हुआ, उनका मरना देखा ज़माने ने, एक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई. अशा ओळीमध्ये त्यांनी टिकास्त्र सोडले होते. 

 "