Sat, Jul 04, 2020 09:02होमपेज › National › देशद्रोहाच्या प्रकरणात हार्दिक पटेलला अटक

देशद्रोहाच्या प्रकरणात हार्दिक पटेलला अटक

Last Updated: Jan 19 2020 11:13AM

हार्दिक पटेलनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना शनिवारी रात्री अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून  अटक करण्‍यात आली आहे. 2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणी हार्दिक पटेल यांना अटक करण्‍यात आली आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात हार्दिक पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

►‘सीएए’च्या अंमलबजावणीस नकार देणे अशक्य : कपिल सिब्बल

अहमदाबादमधील एका न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती आहे.  तसेच हार्दिक पटेल यांना आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असल्‍याची माहिती मिळाली आहे. 

►'आम्ही सोनियांप्रमाणे मोठ्या हृदयाचे नाही, इंदिरा जयसिंग यांना लाज वाटायला हवी'

हार्दिक पटेल यांच्‍यावर का दाखल करण्‍यात आला होता देशद्रोहाचा गुन्‍हा?

25 ऑगस्ट 2015 रोजी पाटीदार आरक्षण समर्थनार्थ  हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.