Mon, Jan 18, 2021 09:23होमपेज › National › चिनी अ‍ॅप्सवर बंदी; भारतीय कंपन्यांना संधी

चिनी अ‍ॅप्सवर बंदी; भारतीय कंपन्यांना संधी

Last Updated: Jul 11 2020 11:07AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. यानंतर मात्र भारतीय कंपन्यांना मोठी सुवर्णसंधी मिळाली आहे. तर सध्या भारतात मिट्रॉन, ट्रेल, रिओटीव्ही, आयस्मा, लोको आणि रूस्टर या अ‍ॅप्सना मोठी संधी मिळाली असून भारतीय अॅप्सना बाजारपेठ खुली झाली आहे.   

चिनी अॅप्सच्या बंदीमुळे भारतातील बाजारपेठेत मोठी संधी निर्माण झाली आहे. सध्या देशातील ॲप्स डेव्हलपर्संनी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरूवात केली आहे.  यावरून एकच गोष्ट निश्चित आहे की, चिनी अॅप्सच्या बंदीमुळे भारतीय अॅप्सना बाजारपेठ मिळाली आहे.

वाचा  : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा होम क्‍वारंटाईन

काही भारतीय कंपन्यांनी सांगितले आहे की, 'या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यत प्रत्येक कंपनी आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी कामगारांची टिम दुप्पट करण्याची योजना आखत आहे. यामुळे कंपनाचे युजर्सही वाढतील. तसेच कंपनीतील कामगाराचे पगारही वाढवण्यात येणार आहेत.' 

वाचा  :दुबेच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या
रिओ टीव्हीचे संस्थापक सक्षम केशरी यांनी सांगितले आहे की, चिनी अॅप्सवर बंदी घातल्यापासून आतापर्यंत गेम स्ट्रीमिंग ॲप रिओ टीव्हीवरील डाऊनलोड दुप्पटीने वाढले आहे. यामागील कारण म्हणजे, चिनी अॅपवर बंदी आणि कोरोना विषाणू देखील आहे, कारण आता बहूसंख्य लोक घरातच आपला वेळ घालवत आहेत आणि या अॅप्सचा खूपच वापर करत आहेत.' 

व्हिडिओ अॅप ट्रेलचे सह-संस्थापक पुलकित अग्रवाल यांनी सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस आपल्या टीमचे कार्यबळ १०० कर्मचार्‍यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.  

लॉंगहाऊस कन्सल्टिंगचे मॅनेजिंग पार्टनर अंशुमन दास यांनी सांगितले की, भारतीय अ‍ॅप कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. नोकरीसाठी ६० ते ७० लाखांचे पॅकेज दिले जात आहे.