Wed, Sep 23, 2020 02:13होमपेज › National › शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदेंच्या ११ समर्थकांना मंत्रिपदाची लॉटरी!   

शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदेंच्या ११ समर्थकांना मंत्रिपदाची लॉटरी!   

Last Updated: Jul 02 2020 1:19PM

ज्योतिरादित्य शिंदे आणि शिवराज सिंह चौहानभोपाळ (मध्य प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

मध्य प्रदेशात आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यांच्या मंत्रिमंडळात नवीन २८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचा दबदबा दिसून आला आहे. 

वाचा : करदात्यांना दिलासा! कर वाचविणाऱ्या योजनांत गुंतवणूक करण्यास मुदतवाढ 

मध्य प्रदेशात आगामी होणाऱ्या पोटनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तारात नवीन मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. पोटनिवडणुकीत अधिक जागा जिंकण्याची रणनिती म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांना अधिक महत्व देण्यात आले आहे. तर भाजपच्या जुन्या नेत्यांचा मंत्रिमंडळात कमी सहभाग दिसून आला आहे.

शिवराज सिंह यांच्या मंत्रिमंडळात २८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात ९ शिंदे समर्थक आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह अगोदरच मंत्री झाले आहेत आणि आता आणखी ९ मिळून एकूण ११ शिंदे समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. शिंदे यांच्यासह एकूण २२ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हातात घेतले होते. यातील निम्मे नेते मंत्री झाले आहेत.

वाचा : देशातील कोरोना रुग्णसंख्या ६ लाखांवर; २४ तासांत ४३४ जणांचा मृत्यू

शिंदे समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपच्या जुन्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर रहावे लागले आहे. यशोधरा राजे शिंदे यांनी मंत्रिपदी शपथ घेतली आहे. त्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अत्या आहेत.
भोपाळमधील राजभवनावर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. गोपाल भार्गव, बृजेंद्र सिंह यादव, भारत सिंह कुशवाह, हरदीप सिंह डंग, इमर्ती देवी, प्रभूराम चौधरी, प्रधूमन सिंह तोमर आदी नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.
 

 "