Sat, Jul 11, 2020 11:00होमपेज › National › भारतात बंदी घातल्यानंतर टिक-टॉक काय म्हणते? 

भारतात बंदी घातल्यानंतर टिक-टॉक काय म्हणते? 

Last Updated: Jun 30 2020 2:07PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये लोकप्रिय टिक-टॉक अ‍ॅपचादेखील समावेश आहे. आता भारतात बंदी घातल्यानंतर टिक-टॉककडून काय प्रतिक्रिया काय आल्या आहेत पाहा. 

एकीकडे संपूर्ण देशात चिनी वस्तूंचा वापर बॅन करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांच्या मोबाईल फोनमध्ये बरीच लोकप्रिय चिनी अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा हॅक होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बंदीची घोषणा केली. परंतु, यानंतर टिकटॉकने आता आपली बाजू मांडली आहे. 

टिकटॉकने ट्विट करून निवेदन जारी केलं आहे. यामध्ये टिकटॉकने म्हटले आहे, टिकटॉक डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. आम्ही कुठल्याही परदेशी सरकारला विशेषकरून चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही. टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. टिकटॉकने पुढे म्हटले आहे, 'भविष्यात डेटाची मागणी आमच्याकडे करण्यात आली, तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत माहिती देणार नाही. युजर्सची गोपनीयता आमच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. टिकटॉक १४ भारतीय भाषांमध्ये सेवा देत आहे. यामध्ये कोट्यवधी युजर्स, कलाकार, गोष्टी सांगणारे, शिक्षणक्षेत्रातील मंडळी आणि टिकटॉकच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवणाऱ्यांचा समावेश आहे.' 

वाचा - बिग ब्रेकिंग : टिकटॉक, यूसी ब्राऊझरसह चीन्यांच्या ५९ ॲपवर केंद्र सरकारकडून बंदी!

टिकटॉकशिवाय यूसी ब्राउझर, कॅम स्कॅनर सारखी बरीच लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत. यावर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी टिकटॉकही यूजर्सवर होत असलेल्या हेरगिरीमुळे चर्चेत आले होते.