Wed, Aug 12, 2020 11:14होमपेज › National › रुग्णसंख्येचा विस्फोट होत असताना भारत व्हेंटिलेटर करणार निर्यात 

रुग्णसंख्येचा विस्फोट होत असताना भारत व्हेंटिलेटर करणार निर्यात 

Last Updated: Aug 02 2020 9:57AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोना संबंधित उच्च स्तरीय केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने भारतात तयार झालेल्या व्हेंटिलेटरची निर्यात करण्याच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय भारताने कोरोनाच्या मृत्यूदरावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवल्यानंतर घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार भारताचा कोरोना मृत्यूदर सध्या २.१५ टक्के आहे. याचा अर्थ भारतात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की हा निर्णय डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडला कळवण्यात आला आहे. त्यानुसार ते भारतात तयार झालेल्या व्हेंटिलेटर निर्यात करण्यासाठीची पुढील कार्यवाही करतील. मंत्रालयाच्या वक्तव्यात 'आता व्हेंटिलेटर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक व्हेंटिलेटरना नवी विदेशी बाजारपेठ खुली होणार आहे.' असे म्हटले आहे. 

जानेवारी महिन्यात जवळपास २० स्थानिक उत्पादकांनी व्हेंटिलेटर तयार केले आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात व्हेंटिलेटर निर्यात करण्यावर बंधने घालण्यात आली होती. यावेळी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी व्हेंटिलेटरची उपलब्धता असावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी २४ मार्च पासून सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर निर्यात करण्यावर बंदी घातली होती.