Tue, Mar 31, 2020 23:54होमपेज › National › #ArmyDay : आर्मी परेडचं नेतृत्व केले 'या' महिला कॅप्टननं; चौथी पिढी देशसेवेत

#ArmyDay : आर्मी परेडचं नेतृत्व केले 'या' महिला कॅप्टननं; चौथी पिढी देशसेवेत

Last Updated: Jan 15 2020 12:41PM

कॅप्टन तान्या शेरगिलनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आज ७२ वा सैन्य दिवस. या दिनानिमित्त दिल्लीत भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडविण्यात आले. विशेष म्हणजे सैन्य दिवसानिमित्त आयोजित केलेल्या लष्कराच्या सर्व तुकड्यांच्या परेडचं नेतृत्त्व कॅप्टन तान्या शेरगिल यांनी केले. तान्या शेरगिल या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सैन्याच्या तुकडीचेही नेतृत्व करणार आहेत. तान्या यांच्या रुपाने त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी सैन्यदलाच्या सेवेत आहे.

वाचा : महिलांना रणभूमीवर संधी

तान्या शेरगिल ह्या सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये कॅप्टन पदावर आहेत. शेरगिल यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये बीटेक केले आहे. त्यांनी इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या वडिलांनी आर्टिलरी विभागात, त्यांच्या आजोबांनी आर्म्ड तर त्यांच्या पंजोबानी शिख रेजिमेंटमध्ये पायदळ सैनिक म्हणून सेवा बजावली आहे. आता तान्या यांच्या रुपाने त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी सैन्यदलात सेवा देत आहे.

वाचा : नाशिककरांनी अनुभवला सैन्य दलातील तोफांचा थरार (video)

गेल्या वर्षी कॅप्टन भावना कस्तुरी यांनी प्रजासत्ताक दिनी सर्व पुरुषांच्या तुकड्यांचे नेतृत्व केले होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच १४४ पुरुषांच्या परेडचं नेतृत्व करण्याचा मान त्यांना मिळाला होता. भावना ह्या हैदराबादच्या आहेत.