Sat, May 30, 2020 01:33होमपेज › National › बस नदीत कोसळली; २४ ठार

बस नदीत कोसळली; २४ ठार

Last Updated: Feb 27 2020 1:31AM
बुंदी :

राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात लग्‍नाचे वर्‍हाड घेऊन निघालेली एक बस नदीत कोसळून 24 जण ठार झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. बस कोटाहून सवाई माधोपूर येथे जात होती. वाटेत लखेरी येथील पापडी गावात एका पुलावरून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही बस मेज नदीत कोसळली.

मृतांंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती बुंदीचे जिल्हाधिकारी अनंत सिंह यांनी दिली. दुर्घटनेत 13 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कुमार यांनी दिली. उर्वरितांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 मुले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्‍त केला आहे.