Sun, Oct 25, 2020 07:13होमपेज › National › सीमेजवळ आर्मीसाठी ४३ पूल तयार; संरक्षणमंत्री आज करणार उद्घाटन

सीमेजवळ आर्मीसाठी ४३ पूल तयार; संरक्षणमंत्री आज करणार उद्घाटन

Last Updated: Sep 24 2020 10:01AM

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 

 

 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

एलएसीवर भारत-चीन दरम्यान तणावस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सीमेजवळील ७ वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण ४३ पुलांचे उद्धघाटन करणार आहेत. यातील सर्वांत अधिक १० पूल जम्मू- काश्मीरमध्ये उभारण्यात आले आहेत. हे सर्व पूल ब्रिज बॉर्डर ऑर्गेनायजेशनने (बीआरओ) उभारले आहेत. 

वाचा : ‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी

जम्मू काश्मीरमध्ये १०, लडाखमध्ये ७, हिमाचल प्रदेशात २, पंजाबमध्ये ४, उत्तराखंडमध्ये ८, अरुणाचल प्रदेशात ८, सिक्कीममध्ये ४ पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांचे उद्घघाटन राजनाथ सिंह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी हिमाचल प्रदेश, पंजाब, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीमचे मुख्यमंत्री तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखचे उपराज्यपाल उपस्थित राहणार आहेत.

वाचा : अमेरिकेची कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात 

मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे पूल रणनिती दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या भागांत उभारण्यात आले आहेत. यामुळे सुरक्षा दलांना तसेच शस्त्रास्त्रे तातडीने पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे.

वाचा : चीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न!

 "