Thu, Sep 24, 2020 10:12होमपेज › National › टॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती!

टॅक्सबद्दल भाजपनेच केली अर्थमंत्र्यांना विनंती!

Last Updated: Jan 29 2020 9:42PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमणनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भाजप सरकारने आगामी अर्थसंकल्पात शेअर बाजाराच्या उत्पन्नावरील कराच्या नियमात बदल करण्याची शिफारस केली आहे. पक्षाचे दिग्गज नेत्यांच्या माहितीनुसार असे झाल्यास देशांतर्गत शेअर बाजारात भांडवली गुंतवणूक वाढेल. वित्तीय बाजारपेठेत काम करणाऱ्या कंपन्यांना शेअर किंवा शेअर-आधारित म्युच्युअल फंडांवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर (एलटीसीजी) रद्द करण्याची किंवा सध्याच्या वर्षापासून झिरो कर वाढवून दोन वर्षाची करण्याची शिफारस केली जाते आहे. दरम्यान १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

भारतात, जर एक वर्ष शेअर खरेदी केले आणि एका वर्षाच्या आत विकली तर तो अल्प मुदतीचा भांडवली १५ %  कर  लागू शकतो. दरम्यान एक वर्षानंतर विकला गेला तर तो दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ १०% ला होऊ शकतो. डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूशन टॅक्स (डीडीटी) च्या नियमात सुधारणा करण्याची आणखी एक मागणी करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प होण्यापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी सल्लामसलत झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांनी उद्योगांना सरकारमधील गुंतवणूकीचे पुनरुज्जीवन करण्याचा आग्रह धरला आहे. याचबरोबर त्यांच्या सुचनेनुसार भाजपचे आर्थिक व्यवहार प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितले. उपायांचा विचार करण्याची विनंती केली आहे.

 "