Sun, Sep 20, 2020 07:40



होमपेज › National › राममंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण इकबाल अंसारींना!

राममंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण अंसारींना!

Last Updated: Aug 03 2020 1:49PM




नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

अयोध्येत श्री राम मंदिर भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याचे पहिले निमंत्रण कोणाला मिळणार या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरू होती. दरम्यान,  अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इकबाल अंसारी यांना पहिली निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे.  

अयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यास कोरोनाच्या सावटामुळे काही मोजक्या लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यातील पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इकबाल अंसारी यांना पाठवण्यात आले आहे. त्यांना हे निमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आले आहे. इकबाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार हाजी महबूब यांना देखील निमंत्रण दिले आहे. तसंच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.

 या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे, याचा फार आनंद आहे. मी या कार्यक्रमात नक्की सहभागी होणार आहे. अशी प्रतिक्रिया इकबाल अंसारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तसेच, सुप्रीम कोर्टाने ही जागा रामललाच्या भव्य मंदिरासाठी दिली आहे. आता यासंदर्भात कुठलाही वाद नाही. मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामांविषयी आदर आहे. कदाचित  भगवान रामांची इच्छा असावी की, मंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मला मिळावे, मी याचे स्वागत करतो. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून झाली. आज सकाळी ९ वाजता गणपती पूजन झालं. तर ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मंदिराचे भूमीपूजन पार पडणार आहे. 





 







"