Fri, Nov 27, 2020 22:48होमपेज › National › 'काश्मीरमध्ये १५ ऑगस्टनंतर निर्बंध शिथील होणार' 

'काश्मीरमध्ये १५ ऑगस्टनंतर निर्बंध शिथील होणार' 

Published On: Aug 14 2019 9:28AM | Last Updated: Aug 14 2019 9:28AM

संग्रहित छायाचित्रश्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अभेद्य फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनाही स्थानबद्ध करण्यात आले होते. कलम हद्दपार करण्यात आल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षा करण्यात आली होती. त्याचबरोबर कलम १४४ सुद्धा लागू करण्यात आले होते. 

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आता निर्बंध शिथील करण्याबाबत सुतोवाच केले आहेत. उद्या (ता.१५) स्वातंत्र्यदिन पार पडल्यानंतर निर्बंध कमी केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. काश्मीर खोऱ्यात फोन तसेच इंटरनेटचा लोकांची माथी फडकावण्यासाठी वापर केला जातो त्यामुळे परिस्थिती पुर्वपदावर येत नाहीत तोपर्यंत त्यावरील निर्बंध कायम राहतील असे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच काश्मीर आणि लडाखचा दौरा करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल यांना काश्मीरला येण्याचे आव्हान दिले होते. ते राहुल यांनी स्वीकारले आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे एक शिष्टमंडळ तेथे जाईल, आम्हाला विमानाची गरज नाही, असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

ट्विटरवर राहुल म्हणाले, आदरणीय राज्यपाल तुमच्या आव्हानानुसार मी आणि विरोधी पक्ष नेत्यांचे शिष्टमंडळ जम्मू-काश्मीर आणि लडाखचा दौरा नक्की करू. आम्हाला विमानाची गरज नाही. कृपया आम्हाला प्रवास करण्यास आणि लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्यावे. याशिवाय, प्रमुख नेते आणि तेथील सैनिकांना भेटण्याचेही स्वातंत्र्य मिळावे. 

राहुल यांनी काश्मीर खोर्‍यातील कथित हिंसेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले होते की, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका. काश्मीरमधील सद्यःस्थिती माहिती व्हावी, यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी मी विमान पाठवेन. तुम्ही येथील परिस्थितीचा आढावा घ्या आणि मग बोला.