Tue, Aug 04, 2020 14:12होमपेज › National › गँगस्टर विकास दुबेचा सहकारी एन्काऊंटरमध्ये ठार 

गँगस्टर विकास दुबेचा सहकारी एन्काऊंटरमध्ये ठार 

Last Updated: Jul 08 2020 8:55AM
हमीरपूर : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा हिस्ट्री शीटर विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने हमीरपूर येथे अमर दुबे याला ठार केले.

वाचा : गँगस्टर दुबेच्या शोधासाठी 100 पथके

अमर दुबे बुंदेलखंड येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याची कार बेवारस अवस्थेत औरेया- दिबियापूर महामार्गावर आढळून आली होती. त्याच्या डार्क ग्रे रंगाच्या फोर्ड कारमध्ये महागडे चप्पल, काही कागदपत्रे मिळाली होती. त्यावरुन त्याच्या घराचा पत्ता मिळाला होता. तसेच तो विकास दुबेचा सहकारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अमर दुबे ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या भागाची घेराबंदी केली. या दरम्यान पोलिसांना चकवा देऊन पळून जाणाऱ्या अमर दुबे याच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. यात तो मारला गेला.

वाचा : गँग्स ऑफ कानपूर : कोण आहे हा विकास दुबे ज्यानं उत्तर प्रदेशाला हादरवून सोडलं?

२ जुलै रोजी पोलिस जेव्हा विकास दुबेच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. यात ८ पोलिस शहीद झाले होते. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यांमध्ये अमर दुबेचा सहभाग होता. या घटनेनंतर विकास सोबत अमर देखील पळून गेला होता. अमर हा विकासच्या खास व्यक्तींपैकी एक आहे.