जेव्हा उपसभापती निलंबित खासदारांसाठी चहा आणतात....

Last Updated: Sep 22 2020 9:35AM
Responsive image


नवी दिल्ल: पुढारी ऑनलाईन

कृषी विधेयकांवरून राज्यसभेत रविवारी खासदारांनी गोंधळ घातला होता. उपसभापतींशी केलेल्या नियमबाह्य वर्तनामुळे सोमवारी राज्यसभा सभापती व्यंकैय्या नायडू यांनी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईला विरोध दर्शवत खासदारांनी संसदेबाहेर आंदोलनाची हाक दिली. काल रात्रभर हे आंदोलन सुरू ठेवत आंदोलक खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच ठिय्या मांडला. मात्र, सकाळी या खासदारांना अनोखे चित्र पाहायला मिळायले. थेट उपसभापतींचं खासदारांसाठी चहा घेऊन आले. उपसभापतींचे हे कार्य पाहून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ट्विट करत कौतुक केले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जेव्हा उपसभापती निलंबित खासदारांसाठी चहा आणतात...

मनात कोणतीही कटुता न ठेवता थेट उपसभापती हरिवंश नारायण निलंबित खासदारांसाठी चहा आणि पोहे घेऊन आले. त्यामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

उपसभापती हरिवंश नारायण यांचे हे कार्य पाहून पंतप्रधान माेदी यांनी ट्विट केले आहे. ''काही दिवसांपूर्वी ज्यांनी तुमच्यावर हल्लाबोल केला आणि अपमान केला तसेच ज्यांनी विरोध दर्शवत आंदोलन पुकारले त्यांना वैयक्तिकरित्या जाऊन चहा देणे. यावरून हे सिद्ध होते की हरिवंशजी नम्र मनाने आणि मोठ्या मनाने आशीर्वादित झाले आहेत. हे त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या या कार्याचे आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जनतेत मीदेखील सामील आहे. ''असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

यावेळी या घटनेसंदर्भात निलंबीत खासदार रिपुन बोरा यांनी एका वृत्तसंस्थेची संवाद साधला. उपसभापती हरिवंश नारायण हे उपासभापती म्हणून नव्हे तर सहकारी म्हणून भेटण्यास आले. त्यांनी येताना आमच्यासाठी चहा आणि नाष्टा आणला आहे. निलंबन कारवाईचा निषेध म्हणून आम्ही कालपासून हे धरणे आंदोलन सुरू केले असल्याचे बोरा यांनी म्हटले आहे. 

तसेच, सरकारकडून कोणीही आमची चौकशी करायला आले नाही अशी खंत व्यक्त करत विरोधी पक्षांचे अनेक नेते आमच्याबद्दल चौकशी करण्यासाठी आणि आमच्याशी ऐक्य दर्शविण्यासाठी आले आहेत. आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असे देखील बोरा यांनी यावेळी स्पष्ट केले.  

नेमके काय घडले होते संसदेत?

रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. तेव्हा सभागृहाचे कामकाज उपसभापती हरिवंश नारायण सांभाळत होते. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापले होते.

निलंबित सदस्यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. वारंवार आवाहन करूनही सदस्य बाहेर न गेल्याने राज्यसभेचे कामकाज तीनवेळा स्थगित करावे लागले. त्यानंतर पीठासीन अधिकारी भुवनेश्‍वर कालिता यांनी मंगळवारपर्यंत कामकाज तहकूब केले. नायडू म्हणाले, रविवारचा दिवस राज्यसभेसाठी वाईट होता. काही सदस्य वेलमध्ये आले. काहींनी कागद फेकले, माईक तोडला. रूल बूक फाडले. उपसभापतींना धमकावले. हे दुर्दैवी आणि निंदनीय आहे. खासदारांनी आत्मपरीक्षण करावे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्याविरोधात आणलेला अविश्‍वास प्रस्तावही नियमानुसार नसल्याचे सांगत फेटाळण्यात आला.

निलंबनाची कारवाई

संसदेच्या पावरसाळी अधिवेशनात रविवारी झालेल्या रणकंदनानंतर सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती व्यंकैय्या नायडू यांनी रविवारी गोंधळ घालणार्‍या आठ खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित केले. राजीव सातव, रिपुन बोरा, सय्यद नजीर हुसैन (काँग्रेस), डेरेक ओ ब्रायन आणि डोला सेन (तृणमूल काँग्रेस), एल. मरन करीम आणि केके रागेश (सीपीआयएम), संजय सिंह (आप) या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, निलंबनाच्या कारवाईला विरोध करत संसदे परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाची हाक दिली. हे आंदोलन रात्रभर सुरू राहिले. गांधींच्या पुतळ्यासमोरच आंदोलकांनी रात्रभर विश्रांती घेतली.

खडसेंसोबत गेले भाजपचे कार्यालय!; मुक्ताईनगरात भाजपला कार्यकर्त्यांसह कार्यालयही शोधावे लागणार 


पंकजा मुंडेंनी शरद पवारांना 'या' कारणासाठी केली विनंती, म्हणाल्या...


ठाणे : १०१ तृतीयपंथियांच्या ओट्या भरून दसरा साजरा


करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 


मिर्झापूर- 2 वेबसीरिजवर मिर्झापूरच्या खासदारांनी केला आरोप, म्हणाले....


साताऱ्यात पोलिसांचे 'मॉक ड्रिल' 


शिवसेनेत जाणार असल्याच्या अफवांवर पंकजा मुंडेंचा खुलासा, म्हणाल्या...


KXIPvsSRH : हैदराबादला पाठोपाठ दोन धक्के


मराठा समाज्यावतीने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा इशारा


नाशिक : वन विभागाने चार बिबट्यांना केले जेरबंद