Sun, Feb 28, 2021 05:34
'चीनने सैनिक मारले, आम्ही ॲप बॅन केली; आता चीनने आत घुसून गाव वसवले, तेव्हा फळाचे नाव बदलले' 

Last Updated: Jan 20 2021 5:15PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात वेबसीरिज तांडव वर 'तांडव' सुरु असतानाच अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून एक गाव उभारून टाकले आहे. त्यामुळे देशात वादंग सुरु असतानाच आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आश्चर्यकारक निर्णय घेताना ड्रॅगनफ्रुटचे नाव कमलम करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भन्नाट मिम्स आणि जोक व्हायरल केले जात आहेत. 

अधिक वाचा : म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घातले ड्रॅगन फ्रुटचे बारसे!

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जाहीर केले की, ड्रॅगन फळ आता कमल म्हणून ओळखले जाईल कारण ते बाहेरून कमळासारखे आकारले आहे. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. देवांगशु दत्ता नावाच्या यूझर्सने लिहिले की, 'जेव्हा चीन ४० सैनिकांना ठार मारतो आणि जमीन ताब्यात घेतो तेव्हा येथे अॅपवर बंदी घातली जाते. चीन भारतात जेव्हा गाव वसवतो, तेव्हा या फळाचे नाव बदलले जाते. 

अधिक वाचा : चीनचं अतिक्रमण; अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर १०१ घरांची उभारणी करून चक्क एक गावचं उभारलं

चीन आणि भारत यांच्यात गलवानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर मोदी सरकारने देशातील चिनी अॅप्सवर बंदी घातली. यानंतर नुकत्याच आलेल्या अहवालानुसार चीनने अरुणाचल प्रदेशातील सीमेच्या आत चार किलोमीटर अंतरावर एक गाव वसवले आहे. याबाबत विरोधक आक्रमक आहेत आणि त्यादरम्यान गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

विजय रुपाणी यांनी फळाचे नाव बदलण्याची घोषणा करताना म्हटले की, हे नाव योग्य नाही, म्हणून ते बदलणे ठीक आहे. बाहेरून बघितले तर ते कमळाप्रमाणे दिसते, म्हणून या फळाचे नाव कमलम असेल. राजकारणाशी याचा काही संबंध नाही, असेही ते म्हणाले. भारतात हे फळ मुख्यतः दक्षिण अमेरिकेतून आयात करून आणले जाते.

अधिक वाचा : सौदीने कतारशी अबोला सोडला; कतार म्हणत आहे इराणशी सुद्धा बोला! पण हा गोडवा आहे की धूर्तपणा? 

भारतातील काही शेतकरी ड्रॅगन फळाची लागवड करत आहेत. पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात एका शेतकऱ्याचा उल्लेखही केला होता. राहुल सबबरवाल नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, 'ड्रॅगन फ्रूटचे नाव कमलम केले आहे. यासह भारतामध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्व फळांना कडक संदेश देण्यात आला आहे.