Wed, Apr 01, 2020 00:04होमपेज › National › 'या' ठिकाणी आहे प्रेमाचे मंदिर; प्रेमीयुगूलांची भरते जत्रा!

'या' ठिकाणी आहे प्रेमाचे मंदिर; प्रेमीयुगूलांची भरते जत्रा!

Last Updated: Jan 16 2020 7:11PM
बुदेलखंड (उत्‍तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन 

भारताच्या विविध प्रांतात अनेक बाबतीत विविधता आहे. त्‍यातच देशाच्या अनेक भागात सण, उत्‍सव, प्रथा, परंपरा या अनोख्या पद्धतीने साजऱ्या होत असतात. आता हेच पहा ना भारताच्या उत्‍तर प्रदेशच्या बांदा जिल्‍ह्यामध्ये अनोख्या पध्दतीची जत्रा भरते. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या जत्रेला आसपासच्या भागातील लोकांमध्ये याला प्रेमिकांची जत्रा या नावाने ओळखले जाते.

अधिक वाचा : 'गोयल यांच्या पुस्तकाचा भाजपच्या दिल्ली कार्यालयात सामुदायिक कट'

बांदा जिल्‍ह्यातील केन नदीच्या किनारी स्‍थित भूरागढ नावाचा किल्‍ला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भूरागढ किल्‍ल्‍यावर ही प्रेमिकांची जत्रा भरते. प्रेमासाठी आपल्‍या प्राणाची आहूती देणाऱ्या नट महाबली मंदिरात मकर संक्रातीच्या निमित्‍ताने या प्रियकरांची जत्रा भरते. हजारोंच्या संख्येने प्रेमी जोडपी या मंदिरात मागणे मागायला येत असतात. स्‍थानिक लोक या मंदिराला प्रेमाचे मंदिर मानतात.

अधिक वाचा : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

या जत्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने श्रध्दाळू दूरवरून येत असतात. केन नदीमध्ये स्‍नान केल्‍यानंतर भूरागढ किल्‍ल्‍यामध्ये 'प्रेमाच्या मंदिरात' पूजा करण्यासोबतच या ठिकाणी लोक मागणेही मागतात. स्‍थानिक लोकांचे म्‍हणने आहे की, ६०० वर्षापूर्वी महोबाचे अर्जुन सिंह भूरागढ किल्‍ल्‍यावर किल्‍लेदार होते. या किल्‍ल्‍यातच मध्य प्रदेशच्या सरबई गावातील एक नट जातीचा युवक बीरन किल्‍ल्‍यामध्ये नोकरी करत होता. नट समुदाय हा नाचन्या गाण्याचे काम करत होता. किल्‍ल्‍यामध्ये नोकरीच्या दरम्‍यान बिरन राजाच्या मुलीच्या प्रेमात पडला. 

अधिक वाचा : एयर आशियाच्या 'सीईओ'ला ईडीची नोटीस

बीरन एक ब्रम्‍हचारी होता. मुलीच्या प्रेमाबद्दल जेव्हा वडिलांना समजले, तेव्हा बीरनसमोर एक अट ठेवण्यात आली. त्‍यानुसार राजाने सांगितले की, जर बीरन एका कच्या धाग्याच्या दोरीवरून चालत नदीच्या दुसऱ्या तीरावरील बांबेश्वर पर्वतावरून किल्‍ल्‍यात पोहचला, तर त्‍याचे लग्‍न राजकुमारी सोबत केले जाईल. 

अधिक वाचा : ‘आपमुळेच निर्भयाच्या मारेक-यांच्या फाशीला विलंब'

मकर संक्राती दिवशी बीरन त्‍या दोरीवरून किल्‍ल्‍यात जात असताना, राजाच्या मंत्र्यांनी राजाला भडकवायला सुरूवात केली की, बीरन किल्‍ल्‍यापर्यंत पोहचेल आणि त्‍यांना त्‍यांच्या मुलीसोबत तो लग्‍न करेल. तेव्हा राजाने दोर कापून टाकला. ज्‍यामध्ये खाली कोसळून बीरनचा मृत्‍यू झाला. 

किल्‍ल्‍याच्या खिडकीतून हे सर्व पाहत असलेल्‍या राजाच्या मुलीने किल्‍ल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केली. या घटनेनंतर किल्‍ल्‍याच्या पायथ्‍याला दोघांच्या समाधी बांधण्यात आली. तेव्हापासून प्रेमी जोडपी या ठिकाणी मागण मागण्यासाठी येत असतात.