Wed, Aug 12, 2020 03:42होमपेज › National › #HyderabadEncounter; जे झाले ते अत्यंत भयानक : मनेका गांधी

#HyderabadEncounter; जे झाले ते अत्यंत भयानक : मेनका गांधी

Last Updated: Dec 06 2019 2:28PM

खासदार मनेका गांधीनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून करण्यात आली होती. आज पहाटे या आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार केले. पोलिसांच्या या कामगिरीचे काहींनी कौतुक केले आहे. तर काहींनी पोलिसांच्या कामगिरीवर टीका केली आहे.

भाजप खासदार मेनका गांधी यांनी यावरती प्रतिक्रिया दिली. जे झालं ते अत्यंत भयानक आहे. आपण कायदा हातात घेऊ शकत नाही. त्या आरोपींना कोर्टाने फाशी दिली असती. तर तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलिस असण्याचा अर्थ काय? अशी टीका खासदार मेनका गांधी यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पोलिसांची चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष केला जात आहे. पीडितेला त्वरित न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आता सोशल मीडियावर हैदराबाद पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.