Thu, Aug 06, 2020 03:07होमपेज › National › आता महिला सुरक्षेसाठी स्कुटरवरुन महिला पोलिस घालणार गस्त 

आता महिला सुरक्षेसाठी स्कुटरवरुन महिला पोलिस घालणार गस्त 

Last Updated: Aug 02 2020 1:09PM
नोएडा : पुढारी ऑनलाईन 

महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी नोएडा पोलिसांनी महिला पथकाची सुरुवात केली आहे. हे पथक स्कुटरवरून शहरात गस्त घालणार आहे. या नव्या गस्ती पथकाचे अनावरण शनिवारी पोलिस आयुक्त आलोक सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, महिला सुरक्षा विभागाच्या डीसीपी वृंदा शुक्ला यांनी या स्कुटर ज्या भागात महिलांचा जास्त वावर असतो त्या भागात तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी 'आमच्याकडे सध्या १०० स्कुटर्स आहेत आणि त्या आम्ही विविध भागात तैनात करणार आहोत. ज्या भागात महिलांचा सतत वावर असतो त्या भागात १२ ते १३ स्कुटर पाठवण्यात येणार आहेत तर ज्या भागात तुलनेने महिलांचा कमी वावर असतो त्या ठिकाणी २ ते ३ स्कुटर गस्त घालतील.' असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की 'सोशल मीडियावरून महिलांची कोणत्या भागात गस्तीची गरज आहे आणि ती कशी पुरवावी याबाबत मते मागवण्यात आली होती. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर ही संकल्पना राबवण्यात येत आहे.'

पोलिस निरिक्षक आलोक सिंह यांनी 'आत आपण ५० गस्ती गाड्यांची सुरुवात केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही यामध्ये वाढ करणार आहोत.' असे सांगितले.