होमपेज › National › 'जिथं राजकीय हस्तक्षेप नसतो, तिथं सीबीआय चांगलं काम कस करत'?

'जिथं राजकीय हस्तक्षेप नसतो, तिथं सीबीआय चांगलं काम कस करत'?

Published On: Aug 14 2019 11:07AM | Last Updated: Aug 14 2019 11:07AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश रंजन गोगोईं यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्रभाव आणि कार्यशैलीवर सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना गोगोई यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे सीबीआय आपली जबाबदारी चोख पार पाडू शकत नाही असा रेशीम चिमटा काढला. 

गोगोई म्हणाले, ज्या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो त्या प्रकरणात सीबीआय चांगले काम करते. मात्र, ज्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असतो. त्यावेळी सीबीआय तेवढी चांगली कामगिरी दाखवू शकत नाही आणि न्यायालयात ते प्रकरण पाहिजे त्या क्षमतेने तडीस जाऊ शकत नाही, असा टोमणाही गोगोई यांनी यावेळी सीबीआयला लगावला.

सरन्यायाधीश गोगोई यांनी जन आदेशांना आंतरराज्‍य गुन्हे चौकशीसाठी समवर्ती सुचीमध्ये सुचीचा भाग बनवला पाहिजे असा सल्ला दिला. जन आदेश सध्या राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. 

सीबीआयद्वारे आयोजित करण्यात आलेल्या दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीबीआयच्या कामकाजात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपावर चिंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी असे का होते? की, ज्यावेळी राजकीय हस्तक्षेप नसतो. त्यावेळी सीबीआय चांगले काम करते असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

सीबीआयच्या कामात कुठे न कुठे राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. सीबीआयला स्वायत्तता मिळावयास हवी असे मत गोगोई यांनी यावेळी व्यक्त केले. सीबीआयमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी अनेकदा न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अंतर्गत भारत सरकार विरुद्ध विनित नारायण प्रकरणात निकाल दिल्याचे रंजन गोगोईंनी सांगितले.