Tue, Mar 09, 2021 15:55
व्हायरल व्हिडीओ : अरे बापरे! ही महिला तर चक्क हत्तीकडून मसाज करून घेतेय

Last Updated: Jan 19 2021 7:51PM
पुढारी ऑनलाईन डेस्क

१९७१ साली सुपरस्टार राजेश खन्नाचा आलेला 'हाथी मेरे साथी' हा चित्रपट प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतला होता की, आजही पाळीव हत्ती पाहिला की राजेश खन्नांचा चित्रपट आठवतो. मुक्या प्राण्यांनी प्रेम दिलं की, ते आपल्या मालकांसाठी जिवाची बाजीदेखील लावतात. इतकंच नव्हे तर, माणसाचे सखेसोबती होतात. त्याची काळजी घेतात. असाच एक हत्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हत्ती एका महिलेच्या शरीराची मसाज करताना दिसत आहे. 

वाचा ः भारत ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’मध्ये अव्वल स्थानी!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती आपल्या सोंडेच्या आणि पायांच्या सहाय्याने एका महिलेची पाठ मसाज करताना दिसत आहे. पहिल्यांदा आपल्या सोंडेने महिलीची डोक्यापासून तळपायांपर्यंत शरीर थोपटून घेतो. नंतर आपल्या जाडजूड पायाने पाठही थोपटतो. हा व्हिडीओ एका ट्विट वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केलेला आहे. त्याला चांगल्याच लाईक्स मिळालेल्या आहेत.

वाचा ः  बीसीसीआयकडून टीम इंडियाला स्पेशल गिफ्ट

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया वापरकर्ते प्रचंड खूष झालेले दिसत आहेत. या व्हिडीओमधील महिलेला कोणत्याही प्रकारचे भय त्या हत्तीपासून नाही, अस दिसत आहे. तीदेखील आपला हत्ती मजाज एन्जाॅय करत आहे. लोक पुन्हा-पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत आणि मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. 

Massage by elephant. 😂😂🤗🤣 pic.twitter.com/QZiIXIulkx

— f.k (@amir2371360) January 16, 2021