Wed, Dec 02, 2020 08:42होमपेज › National › विकास दुबेच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या 

दुबेच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या 

Last Updated: Jul 11 2020 11:20AM
लखनौ : पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेशमध्ये विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर पोलिस त्याच्या साथीदारांचा आणि त्याला शरण देणाऱ्यांचा शोध घेत आहेत. या शोधमोहिमेत आता पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. हे दोघे ग्वाल्हेर येथील असून त्यांची नावे ओम प्रकाश पांडे आणि अनिल पांडे अशी आहेत. या दोघांवर कानपूर हत्याकांडमध्ये सहभागी असलेले आरोपी शिवम दुबे आणि शशिकांत पांडे यांना शरण दिल्याचा आरोप आहे.

कानपूर हत्याकांडामधील आरोपी शशिकांत पांडे (सोनू) आणि शिवम दुबेला ग्वाल्हेर येथील राहणारे दोघे-ओम प्रकाश पांडे आणि अनिल पांडे यांनी आपल्या घरात लपण्यासाठी जागा दिली होती. याप्रकरणी एसटीएफने ओम प्रकाश आणि अनिल पांडेला अटक केली आहे.

वाचा - एन्काऊंटरनंतर विकास दुबेचे वडील काय म्हणाले? 

शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी उत्तर प्रदेशचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला. नपूरमधील बिकरू गावात २ जुलैला आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 

विकास दुबेची कोरोना चाचणी 

उज्जैनमध्ये विकास दुबेला अटक झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.