Fri, Dec 14, 2018 00:04होमपेज › National › बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत फाशी : CM रावत

बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत फाशी : CM रावत

Published On: Jul 12 2018 7:14PM | Last Updated: Jul 12 2018 8:36PMकाशीपूर (उत्तराखंड) :

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषी व्यक्तीला मरेपर्यंत फाशी देण्याची तरतूद राज्यात केली जाईल, अशी घोषणा  उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे.उत्तराखंडमधील काशीपूर येथे आयोजित भाजप राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. 

आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली. या बैठकीत संघटना मजबूत करण्याविषयी तसेच निवडणूक जिंकण्याविषयी रणनिती ठरविण्यात आली.