Sat, Mar 28, 2020 17:22होमपेज › National › ‘पीओके’मध्ये दहशतवादी कँप सुरूच : लष्करप्रमुख नरवणे

‘पीओके’मध्ये दहशतवादी कँप सुरूच : लष्करप्रमुख नरवणे

Last Updated: Feb 20 2020 7:21PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पाक व्याप्त काश्मीरमध्ये जवळपास १५ ते २० दहशतवादी कँप चालवले जात असल्याची शक्यता लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी व्यक्त केली आहे. या कँपमध्ये २५० ते ३५० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. लष्कर प्रमुखांच्या या माहितीनुसार पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे समोर आहे. 

अधिक वाचा : इंटरनेट मुस्कटदाबीने अर्थव्यवस्थेला १९ हजार कोटींचा 'बांबू'

लष्करप्रमुख म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. भारतीय लष्कर सातत्याने दहशतवादी गटांवर दबाव आणत आहे. पाकिस्तानला कदाचित रणनीतीवर पुन्हा विचार करावा लागेल. चीननेही कबूल केले आहे की ते आपल्या मित्र देशाला सर्वकाळ पाठिंबा देऊ शकत नाहीत.

लष्करप्रमुखांनी सैन्यात महिला अधिकार्‍यांना स्थायी कमिशन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, मी हे आश्वासन देऊ इच्छितो की भारतीय सैन्यात महिला अधिका-यांना त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी समान संधी दिल्या जातील.

अधिक वाचा : 'राष्ट्रवाद' शब्द वापरु नका, मोहन भागवतांनी त्यासाठी कारणही सांगितले!

ते म्हणाले की भारतीय लष्कराने प्रत्येक स्तरावर महिला भरतीसाठी पुढाकार घेतला आहे आणि १०० महिला सैन्याच्या जवानांची पहिली तुकडी सैन्य पोलिस केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. भारतीय लष्करात धर्म, जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणाचाही भेदभाव केला जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा : 'शिवसेना सहन करेल पण भाजप आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल'