नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर परेड आयोजित करण्यात आला. मात्र, त्याला हिंसक वळण मिळालं. त्यामध्ये दिल्लीतील आयटीओ येथे ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित शेतकऱ्याने नियोजित मार्ग सोडून गाझीपूरच्या सीमेवरून प्रवेश करणाऱ्या अन्य शेतकऱ्यांसोबत तो आला होता. हा शेतकरी वेगाने ट्रॅक्टर चालवत होता, त्यामुळे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अशी घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यावर गोळी मारली म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे, असा प्रचार करण्यात आला आहे", अशी सफाई पोलिसांनी दिली आहे.
वाचा ः मोठी बातमी! शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल सुरू होणार
मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव नवनीत सिंह असून तो उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील डिबडिबा गावातील आहे. त्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं. परेडमध्ये हा ट्रॅक्टर सहभागी झाला होता. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला आहे.
वाचा ः दिवाळीत रजनीकांत-अक्षयचे चित्रपट आमने-सामने
२६ जावेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत घडलेली हिंसक घटनेनं जगभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मागील २ महिन्यांपासून पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन छेडलेले आहे. आतापर्यंत केंद्र आणि शेतकरी नेत्यांमध्ये ११ बैठका झाल्या. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही म्हणून ठरल्याप्रमाणे आज शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली आणि त्यांला हिंसक वळण मिळाले.