Tue, Aug 04, 2020 14:43होमपेज › National › देशातील कोरोनामुक्‍ती दर 2.1 टक्क्यांनी वाढला

देशातील कोरोनामुक्‍ती दर 2.1 टक्क्यांनी वाढला

Last Updated: Jul 09 2020 1:09AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आता हळूहळू कमी होईल, असा विश्‍वास वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्‍त केला जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनामुक्‍तीचा दर 2.1 टक्क्यांनी वाढला आहे. 

कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत असले, तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 400 हून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात येत आहे. चोवीस तासांत 22 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.

बुधवारी सकाळपर्यंत 22 हजार 752 कोरोनाबाधित आढळून आले. तर  482 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. 16 हजार 883 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 7 लाख 42 हजार 417 वर पोहोचली आहे. यातील 4 लाख 56 हजार 831 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 64 हजार 944 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 20 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आठवड्यात 2 टक्क्यांहून अधिक वाढ

जुलै महिन्याच्या प्रारंभी देशातील कोरोनामुक्‍तीचा दर हा 60 टक्क्यांच्या घरात होता. 1 जुलैला कोरोनामुक्‍तीचा दर 59.43 टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात या दरात जवळपास 2.1 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. बुधवारी कोरोनामुक्‍तीचा दर 61.53 टक्क्यांवर पोहोचला आहे.