Sat, Sep 19, 2020 08:39होमपेज › National › तामिळनाडू : पॉवर प्लांटमध्ये स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी

तामिळनाडू : पॉवर प्लांटमध्ये स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी

Last Updated: Jul 01 2020 1:25PM

photo -twitterचेन्नई : पुढारी ऑनलाईन  

तामिळनाडूतील नेवेली लिग्नाइट प्लांटमधील स्टेज-२ मध्ये एक बॉयलरमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जखमींना एनएलसी लिग्नाइट रूग्णालयात नेण्यात आले आहे.

अद्याप स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी बचावकार्य करत आहे. कुड्डालोर जिल्हा प्रशासनाचे बचाव दलदेखील घटनास्थळी पोहोचले. कुड्डालोर ही राजधानी चेन्नईपासून १८० किलोमीटर दूर स्थित आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, प्लांटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. स्फोट कोणत्या कारणाने झाला, यामागील कारण अद्याप समजलेले नाही. या कंपनीमध्ये २७,००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

याआधी मे महिन्यातदेखील प्लांटच्या एका बॉयलरमध्ये स्फोट झाला होता. ही घटना ८४ मीटर ऊंच असणाऱ्या बॉयलरमध्ये झाली होती. 

 "