Thu, Dec 03, 2020 06:03होमपेज › National › विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा  दणका; आव्हान याचिका फेटाळली

विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा  दणका; आव्हान याचिका फेटाळली

Last Updated: Oct 27 2020 12:52AM
नवी दिल्ली : पीटीआय

कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाला आव्हान देणारी विजय माल्ल्याच्या युनायटेड ब्रेव्हरीज होल्डिंग लिमिटेड (युबीएचएल) या कंपनीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान फेटाळून लावली.

किंगफिशर एअरलाईन्सकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी कंपनीवर बंदीचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात युबीएचएलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  या याचिकेवर न्यायमूर्ती यू.यू. ललित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात ही याचिका फेटाळण्यात आली.

फरार आर्थिक गुन्हेगार विजय माल्ल्याकडून आतापर्यंत 3 हजार 600 कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली असून, अद्याप 11 हजार कोटी त्याच्याकडून येणे आहेत, अशी माहिती एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या गटाकडून  न्यायालयात देण्यात आली.

दरम्यान, कंपनीच्या मालमत्तांवर कर्ज दिलेल्या बँकांचा प्रथम अधिकार असून, सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यावर टाच आणू नये, अशी विनंती बँकांच्या गटाची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी यावेळी केली.