Fri, Oct 30, 2020 19:13होमपेज › National › पद्मनाभस्वामी मंदिरावरील त्रावणकोर राजघराण्याचा हक्क कायम; सुप्रीम कोर्टाचा निकाल

पद्मनाभस्वामी मंदिरावरील त्रावणकोर राजघराण्याचा हक्क कायम; सुप्रीम कोर्टाचा निकाल

Last Updated: Jul 13 2020 1:58PM

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदीर.नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरावरील त्रावणकोर राजघराण्याचा हक्क कायम राहील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याबरोबरच सर्व मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना केली जावी, असे आदेश केरळ उच्च न्यायालयाने 2011 साली दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फिरविला आहे. 

वाचा : वाहन नोंदणीसाठी आता फास्टॅग बंधनकारक

पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार यापुढेही शाबूत राहील, असे न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निकालात म्हटले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून मंदिराचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी तिरुवअनंतपूरम जिल्हा न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक व्यवस्थापन समिती नेमली जाणार आहे. 

वाचा : पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले : काँग्रेस

केरळ उच्च न्यायालयाने 2011 साली दिलेल्या निकालाला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात त्रावणकोर राजघराण्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेचाही समावेश होता. मूळच्या पद्मनाभस्वामी मंदिराचा जीर्णोद्धार 18 व्या शतकात त्रावणकोर राजघराण्याने केला होता. स्वातंत्र्यानंतर हे राजघराणे भारतात सामील झाले होते. 
 

 "