Wed, Jun 03, 2020 21:10होमपेज › National › कपिल सिब्बल यांनी 'त्या' वक्तव्यावरून एक दिवसात मारली पलटी!

कपिल सिब्बल यांनी 'त्या' वक्तव्यावरून एक दिवसात मारली पलटी!

Last Updated: Jan 19 2020 3:32PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सुधारित नागरिकत्व कायद्याला काँग्रेस पक्ष सातत्याने विरोध करत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी कोणतेही राज्य नकार देऊ शकत नाही, कोणत्याही राज्याने या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिल्यास ते असंवैधानिक ठरेल, असे मत व्यक्त केले. पंरतु आपले हे विधान पक्षाच्या विरोधात असल्याचे लक्षात येताच सिब्बल यांनी विधानावर यू टर्न घेतला आहे. 

काय म्हणाले होते सिब्बल वाचा►‘सीएए’च्या अंमलबजावणीस नकार देणे अशक्य

सिब्बल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सीएए असंवैधानिक आहे असे माझे म्हणणे आहे. प्रत्येक राज्य विधानसभेला एक ठराव पास करण्याचा आणि तो मागे घेण्याची मागणी करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक घोषित केल्यास त्याला विरोध करणे कठीण आहे. असे असले तरी आमचा लढा सुरूच राहणार असे  सिब्बल यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा►काश्मीरवर बोलणं मलेशियाला पडले महाग!

दरम्यान, पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी सिब्बल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही तर हा कायदा पुस्तकात राहिल. जर कोणता कायदा पुस्तकात राहिला तर आपल्याला या कायद्याचे पालन करावे लागणार अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये तीव्र मतभेद आहेत. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करणेच योग्य राहिल असे खुर्शीद यांनी म्हटले आहे.