Sat, Apr 10, 2021 19:31
धक्कादायक! चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल

Last Updated: Mar 09 2021 4:47PM

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन

माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चालत्या कारमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पीडितेला बोलूनन घेतले आणि तक्रार दाखल करून घेतली. यामध्ये तीन आरोपींनी अटक केली आहे. 

ही अत्याचाराची घटना सहा महिन्यांपूर्वीची आहे,अशीही माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जयपूर पोलिसांच्या हाती लागल्यामुळे तपासाला गती मिळाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडीओमधील आवाज हा जयपुरमधील लोकांसोबत जुळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यामुळे सीएसटी आणि इतर ४ जिल्ह्यातील पोलिसांना आरोपींची ओळख पटविण्याचं काम दिलं आहे. 

वाचा ः अवघ्या १३ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

या व्हिडीओमधील महिला हा उत्तर प्रदेशमधील आहे. पोलिसांनी महिलेला जयपुरमध्ये बोलावून मानसरोवर ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रारीत मिळालेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर २०२० रोजी न्यू सांगानेर रोडजवळील साई कृपा हाॅटेलमध्ये थांबली होती. दरम्यान, महिलेच्या ओळखीचा संजू बंगाली नाव असलेल्या व्यक्तीने पैशाचं आमिष दाखवत महिलेला एका मुलासोबत पाठविलं. संबंधित मुलाने महिलेला कारमध्ये बसवलं. अगोदरच कारमध्ये चार उपस्थित होते. या व्यक्तींना महिलेच्या हातातील मोबाईल काढून घेतला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याचा व्हिडीओदेखील तयार केला. इतकंच नाही, तर इतर अन्य दोन कारमध्ये महिलेला नेते आणि तिथेही तिच्या अन्य काही जणांनी महिलेवर बलात्कार केला. यामध्ये १२ लोकांचा सहभाग असल्याचं म्हटलेलं आहे.

वाचा ः गजाआड जाण्यापेक्षा लग्न बरे; तरुणाची निघाली रात्रीत ‘वरात’

पीडित महिला ही गुलाब आणि अभिषेक नावाच्या व्यक्तींना ओळखते. यातील गुलाब नावाच्या व्यक्तीने महिलेला धमकी दिली होती. तसेच याबद्दल कोणाला सांगितले की, तुझा व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने याबद्दलची तक्रार दाखल केली नाही. या प्रकरणात १० आयपीएस आणि १० सीआय तपास करत आहेत. तसेच समारे १०० पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अजयपाल लांबाने यांनी दिली.