Mon, Sep 21, 2020 12:43होमपेज › National › भाजप प्रवेशावर सचिन पायलट यांचं स्पष्टीकरण 

भाजप प्रवेशावर सचिन पायलट यांचं स्पष्टीकरण 

Last Updated: Jul 13 2020 8:48AM

मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलटजयपूर  : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात घडामोडी सुरु आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, यावर आता सचिन पायलट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

वाचा :  ज्योतिरादित्य शिंदेंनंतर सचिन पायलट देणार काँग्रेसला धक्का?

मी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी स्पष्टीकरण केले आहे.  ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे गेहलोत यांच्या नेतृत्वात सरकार आहे. हे सरकार संकटात आल्याची चर्चा सुरु आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासूनच अंतर्गत वाद सुरु आहेत. या वादात काल भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी एंट्री केली आहे. त्यांनी ट्विट करुन सचिन पायलट यांची बाजू घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी सचिन पायलटांच्या नाराजीचे औचित्य साधत, एक ट्विट केले होते. काँग्रेसमध्ये टॅलेंटला महत्व दिले जात नाही. सचिन पायलटही एकटे पडले आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सचिन पायलट यांचा छळ केला आहे. हे पाहून मला वाईट वाटत आहे. असे ट्विटमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. 

वाचा : ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचा कोरोना अहवाल आला

 "