Sun, Sep 20, 2020 07:13होमपेज › National › सचिन पायलट भाजपमध्ये; एका नेत्याने केला दावा

सचिन पायलट भाजपमध्ये; एका नेत्याने केला दावा

Last Updated: Jul 13 2020 11:57AM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेस पक्ष सोडणार आणि भाजपचे कमळ हाती घेणार या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले. दरम्यान, या चर्चेला पुर्णविराम देत पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, छत्तीसगडचे काँग्रेस प्रभारी आणि सरचिटणीस पी एल पुनिया यांनी सचिन पायलट यांच्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 

वाचा:भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या चर्चांवर सचिन पायलट यांचं स्पष्टीकरण 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सध्या सचिन पायलट हे भाजपमध्येच असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. सर्वांना माहिती आहे की भाजपची नजर काँग्रेस पक्षावर आहे. आम्हाला भाजपकडून कोणतेही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षात सर्व नेते व कार्यकर्त्यांचा आदर केला जातो. असेदेखील पुनिया यांनी यावेळी म्हटले आहे. 

वाचा:राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात; सचिन पायलट 'नॉट रिचेबल'

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. दरम्यान, सचिन पायलट यांची मनधरणी करण्याऐवजी काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तसेच काॅंग्रेस विधीमंडळीय बैठकीसाठी आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

 "