Wed, Sep 23, 2020 21:18होमपेज › National › सोशल मीडियावर नजर, सुरक्षेत वाढ

सोशल मीडियावर नजर, सुरक्षेत वाढ

Last Updated: Nov 09 2019 10:09AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अयोध्या प्रकरणावर आज सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. त्यामुळे देशभरात जागोजागी सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोलिस फोर्स तैनात करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार गृह मंत्रालयाने अतिरिक्त सुरक्षा दल  उत्तर प्रदेशसाठी उपलब्ध केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू आहे. उत्तर प्रदेशमधील लखनऊ, वाराणसी, कानपूर, अलीगढ, बरेली, मुरादाबाद, रामपुर आदी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेश-काश्मीरमध्ये कलम-१४४ लागू

सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्ट अयोध्या प्रकरणावर निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम १४४  लागू करण्यात आले आहे. 

सोशल मीडियावर नजर 

अलीगढमध्ये इंटरनेटवर बॅन करण्यात आले आहे. तसेत सोशल मीडियावर नजर ठेवण्यात आली आहे. अयोध्या (राम जन्मभूमी) संदर्भात निकाल येणार असून त्यासंदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मॅसेज सोशल मीडियावर शेअर करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

देशातील अनेक राज्यांमध्ये स्कूल-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे.  

मुंबईत ४० हजार पोलिस तैनात

मुंबईमध्ये ४० हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये रिझर्व्ह पोलिस दलाचे जवान देखील आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्हीची नजरदे देखील असणार आहेत. मुंबईमध्ये खास ठिकाणी पोलिस फोर्स तैनात करण्यात आले आहे. 
 

 "