Wed, Jul 08, 2020 05:03होमपेज › National › राज्यसभेच्या ‘गोंधळी’ खासदारांना बसणार चाप!

राज्यसभेच्या ‘गोंधळी’ खासदारांना बसणार चाप!

Last Updated: Feb 20 2020 7:47PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राज्यसभेत गदारोळ घालून वारंवार कामकाज बंद पाडणे गोंधळी खासदारांना भविष्यात महाग पडू शकते. राज्यसभेचे नियम कडक करण्याचा विचार जनरल परपज समिती करीत असून यासंदर्भात समितीने अलीकडेच १२४ नवे नियम लागू करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशी लागू झाल्यास गोंधळी खासदारांना मतदानापासून वंचित रहावे लागू शकते.

अधिक वाचा : इंटरनेट मुस्कटदाबीने अर्थव्यवस्थेला १९ हजार कोटींचा 'बांबू'

वरिष्ठ सदस्यांचे सभागृह ही राज्यसभेची ओळख असली तरी अनेकदा लोकसभेपेक्षा राज्यसभेतच प्रचंड गदारोळ असल्याचे दिसून येते. सभापतीकडून वारंवार केल्या जाणार्‍या आवाहनाला विरोधी पक्षाचे खासदार प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जनरल परपज समितीने कामकाजाला शिस्त लावण्याच्या हेतूने अनेक शिफारशी केल्या आहेत. वारंवार सांगूनही जे खासदार गोंधळ घालणे थांबवणार नाहीत, अशांना विधेयकावरील मतदानापासून वंचित रहावे लागू शकते. जनरल पर्पस समितीने १२४ नवीन नियम लागू करण्याबरोबरच ७७ नियमात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.

नवीन नियम लागू करण्यात आले तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालणार्‍या राज्यसभेच्या खासदारांना सभापती कामकाजातून निलंबित करू शकतात, सदस्याला पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा अधिकार सभापतीना प्राप्त होईल. जनरल पर्पस समिती आपला अहवाल नियमविषयक समितीकडे सोपविणार आहे. शिफारशी लागू करायच्या की नाही, याचा निर्णय नियमविषयक समिती अधिक विचारविमर्श करून घेणार आहे.

अधिक वाचा : 'राष्ट्रवाद' शब्द वापरु नका, मोहन भागवतांनी त्यासाठी कारणही सांगितले!