Thu, Aug 06, 2020 03:32होमपेज › National › राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

Last Updated: Aug 01 2020 5:16PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अमरसिंह हे जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही झाले होते. 

अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये झाली. तेव्हा त्यांची पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले होते. उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं आजपर्यंत वजन होतं.