'खासदारांच्या गैरवर्तनामुळे रात्रभर झोपू शकलो नाही, एक दिवस उपोषण करणार'

Last Updated: Sep 22 2020 10:46AM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

राज्यसभेत कृषी विधेयक मंजुरी दरम्यान विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधी खासदारांच्या गैरवर्तनाचा निषेध म्हणून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी २४ तासांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी राज्यसभा सभापतींना पत्र लिहिले आहे. राज्यसभेत जे काही झाले त्यामुळे आपल्याला खूप मानसिक वेदना झाल्या. मी रात्रभर झोपू शकलो नाही, असे हरिवंश यांनी पत्रात म्हटले आहे.

वाचा : जेव्हा उपसभापती निलंबित खासदारांसाठी चहा आणतात....

पत्रात काय म्हटल आहे...

त्यांनी पुढे म्हटले आहे की, सभागृहात सदस्यांनी लोकशाहीच्या नावाखाली हिंसक वर्तन केले. आसनावर बसलेल्या व्यक्तीला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. उच्च सदनाच्या मर्यादा ओलांडल्या. सदस्यांनी नियम पुस्तिका फाडून टाकली. कागद माझ्यावर भिरकावले. हा त्यांचा आक्रमक व्यवहार होता. ही घटना रात्रभर माझ्या डोक्यातून गेली नाही. रात्रभर झोपू शकलो नाही. उच्च सदनात मला अपमानजनक वर्तवणुकीला सामोरे जावे लागले. त्यासाठी मला एक दिवसाचा उपवास करायला हवा. ज्यामुळे गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांच्या मनात आत्मशुद्धीची भावना जागृती होईल, अशा शब्दांत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वाचा : बहुचर्चित कृषी सुधारणा विधेयकांत आहे तरी काय? 

संसदेबाहेर खासदारांचे आंदोलन...

दरम्यान, गोंधळ घालणार्‍या आठ खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईला विरोध दर्शवत खासदारांनी संसद परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच ठिय्या मांडत आंदोलन केले. रात्रभर हे अनोखे आंदोलन सुरु होते. मात्र, सकाळी थेट उपसभापतींच या खासदारांसाठी चहा घेऊन आले. उपसभापतींचे हे कार्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कौतुक केले आहे.

वाचा : राज्यसभेतील ८ खासदार निलंबित

Image

Image

Image

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे पॉर्न व्हिडिओ बनवून केले व्हायरल; नराधमाला अटक


सांगली : कवठेमहांकाळ एसटी आगार व्यवस्थापकाला लाच घेताना अटक


पत्नीसोबतच्या शरीर संबंधांचे चित्रीकरण करून हुंड्यासाठी छळ करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल!


पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती डॉ. रामराव बापू महाराजांचे निधन


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील गोगीला धमकी 


पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून ऑफर?; संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चेला उधाण


'आईने माफी मागितली की नाही माहित नाही पण बाप म्हणून मी मुलाकडून माफी मागतो'


चुंबन सम्राट इम्रान हाश्मी जेव्हा 'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षितशी रोमान्स करतो! (video) 


पिंपरी : आता जिवंत सोडायचे नाही म्हणत १०० जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड!


पुलवामा हल्ल्याची पाकिस्ताननं कबुली दिल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले...