Fri, May 07, 2021 17:47
आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास पुन्हा टेस्ट करू नका

Last Updated: May 05 2021 2:25AM

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सध्या कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करणार्‍या प्रयोगशाळांवर मोठ्या प्रमाणात येणार्‍या नमुन्यांमुळे ताण येऊ लागला आहे. तो पाहता आता ‘आयसीएमआर’कडून (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चाचण्यांबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

एखाद्याची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह येऊन गेली असेल, तर पुन्हा त्याची आरटी-पीसीआर चाचणी केली जाऊ नये, या सूचनेसह  रुग्ण रुग्णालयातून घरी जाताना त्याची चाचणी करण्याची गरज नाही, या सूचनेचाही नव्या मार्गदर्शक सूचनांत समावेश आहे.

देशात सध्या एकूण 2 हजार 506 प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्याचा प्रचंड ताण वैद्यकीय कर्मचार्‍यांवर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातील कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कामाचा ताण वाढतोच आहे. त्यामुळे उपलब्ध चाचणी क्षमतांचा योग्य वापर म्हणून आवश्यक आहे, असे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केले आहे.