Thu, Jun 04, 2020 00:21होमपेज › National › सुदर्शन पटनायकने अशा दिल्‍या 'बिग बीं'ना शुभेच्छा 

सुदर्शन पटनायकने अशा दिल्‍या 'बिग बीं'ना शुभेच्छा 

Last Updated: Oct 11 2019 9:00AM
पुरी : पुढारी ऑनलाईन

पुरी हे भगवान जगन्नाथासाठी जसे जगभर प्रसिध्द आहे. तसेच पुरीच्या समुद्र किनाऱ्यावरच्या सोनेरी वाळूत कलाकृती साकारणारा सुदर्शन पटनायकलाही जगभर ओळखले जाते. आज हिंदी चित्रपटसृष्‍टीचे महानायक म्‍हणजेच बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्‍या पार्श्वभूमीवर सुदर्शनने वाळूत खास शिल्‍प साकारून अमिताभ यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. 

बॉलिवूडचे शहेशनशहा, महानायक, बिग बी अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्‍टीत अनेक हिट चित्रपट दिले. त्‍यांचे चित्रपटसृष्‍टीतील योगदान मोठे आहे. त्‍यामुळे देशासह जगभर त्‍यांचे चाहते आहेत. अमिताभ बच्चन आज वयाच्या ७७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मात्र त्‍यांची जादू आजही कायम आहे. मोठ्या पडद्यापासून कोण बनेगा करोडपतीपर्यंतचा छोटा पडदाही त्‍यांनी गाजवला. 

अशा या महानायकाचा आज ७७ वा वाढदिवस त्‍यांचे चाहते वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करून त्‍यांना शुभेच्छा देत आहेत. त्‍यात ओडिशाच्या पुरीमध्ये समुद्र किनाऱ्यावर सुदर्शन यांनी वाळूत अमिताभ बच्चन यांचे वाळूत शिल्‍प साकारले आहे. पांढरी दाढी, काळ्या फ्रेमचा चष्‍मा आणि खांद्यावर सोनेरी शाल घेतलेले बिग बी साकारले आहेत. त्‍यात पाठीमागे फिल्‍म रीळ त्‍यावर हॅपी बर्थडे बिग बी ७७ असे लिहून त्‍यांना शुभेच्छा देण्यात आल्‍या आहेत. त्‍याने हे वाळूशिल्‍प ट्विटरवरवर पोस्‍ट करत, त्‍यावर हे भगवान जगन्नाथा अमिताभ बच्चन यांना चांगले आरोग्‍य आणि दिर्घायुष्‍य दे अशी प्रार्थना केली आहे. 

सुदर्शन पटनायक हे नेहमीच आपल्‍या सँड आर्टमधून अनेक सेलिब्रेटींना शुभेच्छा देण्यासोबतचं, पर्यावरण वाचवा, सेव्ह वाटर, सेव्ह गर्ल, सेव्ह फॉरेस्‍ट यासारख्या सामाजिक ज्‍वलंत विषयावरही प्रबोधनात्‍मक वाळू शिल्‍प साकारून कलात्‍मक संदेश देतात. म्‍हणूनच त्‍यांची ही कला आज जगभरात पोहोचली आहे.