होमपेज › National › प्रियांका गांधी दिल्लीला बाय बाय करुन 'या' शहरात जाणार?

प्रियांका गांधी दिल्लीला बाय बाय करुन 'या' शहरात जाणार?

Last Updated: Jul 02 2020 4:51PM

प्रियांका गांधी-वधेरानवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा 

उत्तर प्रदेश काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वधेरा यांना लोधी रोड वरील सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश  दिले आहेत. यानंतर प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका गांधी दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करतील. परंतु, त्या उत्तर प्रदेशात पूर्णपणे शिफ्ट होणार नाहीत. त्या कुटुंबासोबत दिल्लीमध्येच राहतील. 

सूत्रांच्या माहितीनुसार, त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी महासचिव आहेत. त्यांना पक्षाच्या कार्यासाठी तसेच २०२२ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांना सतत लखनऊला जावे लागते. त्यामुळे प्रियांका काही दिवसांसाठी लखनऊमध्येही राहतील. 

वाचा - शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदेंच्या ११ समर्थकांना मंत्रिपदाची लॉटरी!  

सरकारने काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वधेरा यांना लोधी इस्‍टेटचा सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून यासाठी एक महिन्याची म्हणजेच १ ऑगस्‍ट, २०२० पर्यंतची मुदत दिली आहे. आदेशात बंगला रिकामा करण्यामागील कारण एसपीजी सुरक्षा व्‍यवस्‍था (विशेष सुरक्षा समूह) हटवल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाकडून नोटिस पाठवण्यात आली असून जर प्रियांका वधेरा यांनी ऑगस्टच्या १ तारखेला बंगला सोडला नाही तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. 

वाचा - 'त्यामुळे' प्रियांका गांधींना एका महिन्यात बंगला रिकामा करण्याचे आदेश! 

केंद्र सरकारने बुधवार (दि. १ जुलै) ला प्रियांका गांधी वधेरा यांच्या नावाने एक पत्र लिहिले आहे. यामध्ये प्रियांका यांना सरकारी बंगल्याचे भाडे ३,४६,६७७ रुपये देण्यासंदर्भात म्हटले आहे.  प्रियांका यांची सुरक्षा आता एसपीजी नाही. त्याजागी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रियांका आता सरकारी बंगल्याच्या हकदार नाहीत.