Thu, Aug 13, 2020 16:44होमपेज › National › गँगस्टर दुबे प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रियांका गांधी

गँगस्टर दुबे प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ः: प्रियांका गांधी

Last Updated: Jul 09 2020 10:22PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

गँगस्टर विकास दुबे याच्या अटकेवर संशय व्यक्‍त करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी केली आहे.

अधिक वाचा : उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे सापडला मध्य प्रदेशात पण...

प्रियांका गांधींनी ट्विट केले आहे की, या गुन्हेगाराचे वरिष्ठ अधिकारी, नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी गरजेची आहे. कानपूरमधील पोलिसांच्या निर्घृण हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश सरकारने जितकी तत्परता दाखवणे गरजेचे होते तितकी दाखवलेली नाही. त्यातून यूपी सरकारचे अपयश दिसून येत आहे. सतर्कतेनंतर दुबे उज्जैनला पोहोचला. यातून सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा आणि अपयश दिसून येते. तीन महिने जुन्या पत्रावर काहीही कारवाई केलेली नाही. कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत दुबेचे नाव नसल्याने त्याचे संबंध उच्च स्तरापर्यंत होते, हे स्पष्ट होते.

अधिक वाचा : कानपूर शूटआउट : गँगस्टर विकास दुबेचे दोन सहकारी एन्काऊंटरमध्ये ठार