Fri, Apr 23, 2021 14:35
कोरोना- पंतप्रधान मोदी यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Last Updated: Apr 08 2021 8:30AM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी लसीचा दुसरा डोस घेतला. एम्समध्ये जाऊन त्यांनी भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिनही लस टोचून घेतली. लसीकरणाचा फोटो ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी शेअर केला आहे. ‘एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तत्काळ लस घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. १ मार्च रोजी त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. 

वाचा : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला डोस घेताना चेहऱ्यावरील मास्क काढल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका झाली होती. मात्र, आजच्या लसीकरणावेळी त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याचे छायाचित्रात दिसून येते. 

दरम्यान, देशभरात लसीच्या पुरवठ्यावरून विविध राज्यांमध्ये गोंधळ आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार पुरेसा लसीचा पुरवठा करत नाही, त्यामुळे दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

वाचा : कटात सामील असल्याने मनसुखची हत्या