टाटा समूहाच्या कोरोना ‘टेस्ट किट’ला परवानगी

Last Updated: Sep 22 2020 1:24AM
Responsive image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टाटा समूहाच्या कोरोना टेस्ट किटच्या सार्वजनिक वापराला औषध नियंत्रण महासंचालनालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. दोन तासांमध्ये कोरोनाचे निदान करणारे हे देशातील पहिले कोरोना टेस्ट किट असून, ‘आरटी-पीसीआर’प्रमाणेच टाटा समूहाचे फेलुदा टेस्ट किटही अचूक परिणाम दर्शवेल, असा टाटा समूहाचा दावा आहे.

‘सीएसआयआर-आयजीआयव्ही तसेच आयसीएमआर’च्या सहकार्याने टाटा समूहाने या किटची निर्मिती केली आहे. टाटाच्या या किटची चाचणी 600 रुपयांना केली जाणार आहे. वेळ आणि पैसा, अशी दुहेरी बचत टाटाच्या या किटमुळे होणार आहे.

भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर अन्य महामारींच्या परिस्थितीतही केला जाऊ शकेल. टाटा सीआरआयएसपीआर टेस्ट सीएएस-9 प्रोटिनचा वापर करणारे जगातील असे पहिले परीक्षण आहे, जे कोरोना विषाणूची अचूक ओळख पटवते. आरोग्य मंत्रालयाने हे ‘मेड इन इंडिया’ उत्पादन सुरक्षित, विश्‍वसनीय, असल्याचे स्पष्ट केले आहे.

टाटा टेस्ट किटचे पहिले वृत्त दै. ‘पुढारी’त

स्वदेशी, ‘मेक इन इंडिया’बद्दल ‘पुढारी’ नेहमीच आग्रही राहिलेला आहे. टाटा समूहाच्या कोरोना टेस्ट किट बनविण्याच्या या प्रकल्पाबद्दलचे सविस्तर वृत्त सर्वप्रथम दै. ‘पुढारी’नेच प्रकाशित केले होते.

नवरात्रौत्सव : देवींचे लाईव्ह दर्शन पाहा आता 'पुढारी ऑनलाईन'वर


पुण्यात वकिलाचा खून : शेंडे मास्टरमाईंड; दृश्यम स्टाईलनं रचला कट


आयपीएलमध्ये कॅमेऱ्यात टिपलेली ती 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?


'सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर' 


कोल्हापूर : राजाराम बंधारा येथे पोहण्यासाठी गेलेला मुलगा बुडाला, एकाला वाचविण्यात यश


पोलिसाचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, वाचवण्यासाठी गेलेला दुसरा पोलिसही जखमी


मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा नाहीच - फडणवीस


'या' डॉक्टराचा भन्नाट डान्स पाहिला का? ऋतिक रोशननेही घेतली दखल (Video)


मोठा दिलासा! देशात फेब्रुवारीपर्यंत राहणार कोरोनाचे केवळ ४० हजार रुग्ण


कोरोनामुळे जवळचा मित्र गमवल्याने मास्टर ब्लास्टर भावूक