Sat, Oct 31, 2020 15:16होमपेज › National › अनुराग कश्यपवर पायलचा लैंगिक शोषणाचा आरोप

अनुराग कश्यपवर पायलचा लैंगिक शोषणाचा आरोप

Last Updated: Sep 20 2020 1:34AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अनुराग कश्यपने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली, असे म्हणत पायल घोष हिने कश्यपवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत तिने ट्विटरद्वारे ही मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली आहे.

अनुराग कश्यपने आपल्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मदत करा आणि या सर्जनशील माणसामागील खरी प्रतिभा देशाला पाहू द्या. आपल्याला माहीत आहे की, यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आपली सुरक्षादेखील धोक्यात आहे. कृपया मदत करा, असे ट्विट पायल घोष हिने केले आहे.

 "