Sat, Jul 04, 2020 14:08होमपेज › National › देशांतर्गत विमानसेवा सुरु होऊन दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत विमानातच सापडला कोरोनाग्रस्त!

देशांतर्गत विमानसेवा सुरु होऊन दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत विमानातच सापडला कोरोनाग्रस्त!

Last Updated: May 27 2020 8:25AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात गेल्या दोन दिवासांपासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही राज्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता इंडिगोच्या चेन्नई ते कोईबत्तुर विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने खळबळ उडाली आहे. याचबरोबर एअर इंडियाचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने  विमानसेवा कोरोना वाहक ठरण्याची दाट शक्यता आहे. 

देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी इंडिगो विमान सेवा कंपनीच्या विमानाने चेन्नई ते कोईबत्तुर हे पहिल्या दिवशी उड्डान केले होते. या उड्डाणातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह अढळला. त्यामुळे त्या विमानातून प्रवास केलेल्या जवळपास 100 प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत इंडिगो प्रशासनाने 'त्या प्रवाशाला इएसआय स्टेट मेडिकल फॅसिलिटीमध्ये क्वॉरंटाईन केले आहे. प्रवासात त्याच्या शेजारी कोणताही प्रवासी बसला नव्हता. विमानातील कंपनीचे सर्व कर्मचारी 14 दिवस उड्डाण करणार नाहीत.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. 

वाचा : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर

या घटनेपाठोपाठ सोमवारी दिल्ली - लुधियाना उड्डाण केलेल्या या एअर इंडियाच्या विमानातील 50 वर्षीय सुरक्षा कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तो मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. लुधियानाच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्याला लुधियानाच्या स्थानिक अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याच्याबरोबर प्रवास केलेल्या 10 प्रावाशांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

वाचा : ७२%  वर्क फ्रॉम होमला लोकांची पसंती

देशात अंतर्गत विमान प्रवास सुरु केल्यानंतर दोनच दिवसात विमान सेवा ही कोरोनाची वाहक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे देशातील विमानतळ प्रशासनावर येणाऱ्या प्रवाशांचे कडक स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्याचे आव्हान असणार आहे.