Mon, Aug 10, 2020 04:25होमपेज › National › 'मागील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना पास करा'!

'मागील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना पास करा'!

Last Updated: Jul 10 2020 9:43PM

काँग्रेस नेते राहुल गांधीनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील कोरोना संसर्गामुळे प्रलंबित असलेल्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबतचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सद्यपरिस्थितीत परीक्षा रद्द करण्याची तसेच मागील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना पास करण्याची मागणी यूजीसीकडे केली आहे. 

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियातून विद्यार्थी याचा विरोध करीत आहेत. परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधीही मैदानात उतरले आहेत. एका व्हिडीओतून त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, हा विद्यार्थ्यांसोबत अन्याय आहे. यूजीसीने आपल्या निर्णयांनी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. 

आयआयटी मध्ये परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास केले गेले. मग महाविद्यालय, विद्यापीठातील अंतिम वर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांना मागील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना पास केले पाहिजे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी 6 जुलै रोजी यूजीसीला सुधारित दिशानिर्देश जारी करताना 30 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांना पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते.