आधी अनुराग ठाकूर बोलले नंतर अधीर रंजन चौधरी यांनी केली कडी! पीएम केअर्सवरुन लोकसभेत राडेबाजी

Last Updated: Sep 18 2020 7:18PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पीएम केअर्स फंडाबाबतचे विधेयक लोकसभेत मांडले जात असताना भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या काही आरोपांवरून लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी ठाकूर यांच्यावर आपत्तीजनक टिप्पणी केली. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.

काँग्रेसच्या खासदारांनी ठाकूर यांच्या माफीची मागणी केली तर सत्ताधारी भाजप खासदारांनी चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राडेबाजी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम केअर्स फंडाच्या अनुषंगाने लोकसभेत विधेयक सादर केले. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू-गांधी घराण्याच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले. पीएम रिलीफ फंडचा वापर या खानदानाने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी या आरोपावरून चांगलेच आक्रमक झाले. बोलण्याच्या ओघात चौधरी यांनी ठाकूर यांना उद्देशून 'हिमाचल का छोकरा' असे वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर विरोधी खासदारांनी ठाकूर यांच्या माफीची मागणी करीत सदन दणाणून सोडले.

गदारोळामुळे लोकसभा अध्यक्ष तसेच पीठासीन अधिकाऱ्यांना अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. गदारोळ सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षांवरच पक्षपातीपणाचा आरोप केला. 

पीएम रिलीफ फंडमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे सरकारने पीएम केअर्स फंडची स्थापना केली असल्याचे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. पीएम केअर्स फंडला आक्षेप घेत विरोधी पक्षांनी वारंवार सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, पण दरवेळी न्यायालयाने सरकारच्या बाजूने कौल दिला. पीएम केअर्स फंडमध्ये लहान मुले, वृद्धांनीदेखील आपला खारीचा वाटा उचलला आहे. दुसरीकडे पीएम रिलीफ फंडची स्थापना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी एका कुटुंबाच्या फायद्यासाठी केली होती. 1948 साली पीएम रिलीफ फंडची स्थापना झाली पण अजूनही याची नोंदणी झालेली नाही तसेच त्याला एफसीआरएचा परवाना कसा काय प्राप्त झाला, असे प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केले. बाधित झालेले सदनाचे कामकाज पूर्ववत होण्यापूर्वी ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असे सांगितले.

जॅकलिन फर्नांडिसकडून तीन topless फोटो शेअर करत चाहत्यांना 'स्पेशल' संदेश!


'तर भाजपकडून सांगितले जाईल लस टोचण्यासाठी आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!'


'तर भाजपकडून सांगितले जाईल लस टोचण्यासाठी आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!'


होम क्वारंटाईन असलेल्या अजित पवार आणि नाथाभाऊंची 'अशी' झाली भेट!


केकाटणाऱ्या रिपब्लिक टीव्हीसह अर्णव गोस्वामींना दणक्यावर दणके सुरुच!


भाजपला सलग दुसऱ्या दिवशी भगदाड! सहयोगी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार


'चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून आमदार सोडा पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येईल का?'


गौतम पाषाणकरांची सुसाईड नोट मिळाली  शोधासाठी पाच पथके


पीककर्ज देताना जुन्या कर्जाचे व्याज घेतले असेल तर परत करा


काश्मीरचा झेंडा परत मिळेपर्यंत कोणत्याही झेंड्याला सलाम नाही