Fri, Jul 03, 2020 01:21होमपेज › National › मन की बात : कोरोनाची लढाई अजून गंभीर स्थितीतच

मन की बात : कोरोनाची लढाई अजून गंभीर स्थितीतच

Last Updated: May 31 2020 11:36AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात मार्फत देशावासियांशी संवाद साधला. ही त्यांची लॉकडाऊन मधील दुसरी मन की बात होती. कालच केंद्रीय गृहमंत्रालयाने देशात दोन महिन्यानंतर आता दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर अनलॉक फेज सुरु झाल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधान आजच्या मन की बात मध्ये याच संदर्भात बोलतील असा अंदाज होता. त्याप्रमाणे मोदींनी यावेळी त्यांनी कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही, अजूनही ती गंभीर स्वरुपातच आहे असे सांगितले. त्यामुळे आधी जशी खबरदारी घेत होता तशीच आताही घेण्याची गरज आहे. शारीरिक अंतर, तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. 

याचबरोबर भारतात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अनेक लोक आपली कल्पकता वापरत आहेत. याचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या एका युवकाने गावात सॅनिटाझरचा कल्पक ट्रॅक्टर तयार करुन गाव सॅनिटायझ केल्याचे उदाहरणही दिले. 

मन की बाद मधील महत्वाचे मुद्दे 

- दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताचा कोरोना मृत्यूदर कमी, 

- सी मोहन यांनी कष्टाचा पैसा कोरोनाच्या संकटकाळात गरीबांसाठी दिला

- देशात अनेक लोक कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कल्पकता दाखवत आहेत

- भारतात लोक आता लोकल उत्पादनासाठी व्होकल झाले आहेत 

- लॉकडाऊनमध्ये देशातील अनेक लोक योग साधनेकडे वळले आहेत

- लाखो मजूर रेल्वेच्या मध्यमातून आपल्या घरी पोहचले आहेत

- भारतात आयुषमान भारत योजनेचा अनेक लोक लाभ घेत आहेत

- आयुषमान भारत योजनेचा 1 कोटी जनतेला लाभ 

- आम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल आणि उडिसाचे मोठे नुकसान

- टोळधाडीमुळेही भारतातील अनेक राज्यांना तडाखा बसत आहे

- 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस आहे, यावेळेची थीम जैवविविधता आहे

- लॉकडाऊनमुळे पर्यावरणाचे मूळ रुप परत येण्यास मदत मिळत आहे

- ही परिस्थिती कायम राहिल का हा प्रश्न लोकांच्या मनात आहे

- पर्यावरणाशी एकरुप होऊन आपण आपले जीवन व्यतित करु शकतो

- यंदाच्या पावसाचे पाणी आडवून त्याचे संरक्षण करु 

- पर्यावरण दिनाला काही झाडे नक्की लावा 

- कोरोना विरुद्धची लढाई अजूनही गंभीर स्वरुपात आहे, त्यामुळे आधी घेत होता तशीच काळजी तुम्ही घ्या