'पंतप्रधान मोदी आता ५०० वर्षांमधील सर्वोत्तम नेते बनले'

Last Updated: Aug 05 2020 11:19AM
Responsive image


भोपाळ : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ( दि. 5 ) अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. त्यासाठी ते दिल्लीतून रवाना होऊन अयोध्येत दाखल झाले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आजच कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना 'पंतप्रधान मोदी आज राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. 500 वर्षापूर्वी जो महायज्ञ सुरु झाला होता त्याचे फळ आज मिळत आहे. पंतप्रधान मोदींची इच्छाशक्ती आणि मार्ग काढण्याची प्रवृत्ती त्यांना आज भारतातील 500 वर्षामधील सर्वोत्तम नेता बनवत आहे.' अशी प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आज चिरायू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचा 25 जुलैला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढचे 7 दिवस गृह अलगीकरणात राहण्याचा आणि आपल्या प्रकृतीवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.