Thu, Sep 24, 2020 10:36होमपेज › National › दिल्ली निवडणुकीसाठी पीएम मोदी भाजपचे स्टार प्रचारक

दिल्ली निवडणुकीसाठी पीएम मोदी भाजपचे स्टार प्रचारक

Last Updated: Jan 22 2020 6:30PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी : संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्ली विधानसभा निवडणुकीची नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी भाजप, काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारक राहतील. तर, काँग्रेसच्या प्रचाराची धूरा राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींसह राहूल आणि प्रियंका गांधींच्या खांद्यावर राहील.

अधिक वाचा : केजरीवालांचे दोन आमदार राष्ट्रवादीच्या गळाला!

गेल्या काही महिन्यांपासून प्रकाशझोतात नसलेले काँग्रेसचे फायरब्रॅन्ड नेते नवज्योतसिंह सिद्धू आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेशही स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मनोहरलाला खट्टर, जयराम ठाकूर, त्रिवेंद्र सिंह रावत  तसेच इतर दिग्गज भाजपसाठी मतांचा जोगवा मागतांना दिसून येतील.

अधिक वाचा : नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधीया ही काँग्रेसकडून प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून अद्यापही मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

अधिक वाचा : सीबीआयकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सहकाऱ्यांवर ४ नवीन खटले दाखल

 "