Mon, Jan 18, 2021 08:45होमपेज › National › पायलट भाजपवासी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या 'त्या' नेत्याची कोलांटीउडी

पायलट भाजपवासी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या 'त्या' नेत्याची कोलांटीउडी

Last Updated: Jul 13 2020 12:28PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

काही तासांपूर्वी छत्तीसगडचे काँग्रेस प्रभारी सरचिटणीस पी एल पुनिया यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपवासीच असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. मात्र, पुनिया यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुनिया यांनी ट्विट करत पायलट भाजपवासी म्हणणाऱ्या वक्तव्यावरून कोलांटीउडी घेतली आहे. एका वृत्तसंस्थेने मला भाजपनेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले होते. प्रतिक्रिया देतेवेळेस माझ्या तोंडून सचिन पायलट यांचे नाव बाहेर पडले. मला पायलट यांच्याऐवजी ज्योतिरादित्य शिंदे म्हणायचे हाेते. चुकीने पालयटांचे नाव घेतले. असे सांगत पायलट यांनी स्वतःहून भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे पुनिया यांनी म्हटले आहे. तसेच, पायलट हे काँग्रेसचेच सदस्य आहेत, असेदेखील पुनिया यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

आपण केलेले वक्तव्य हे चुकीचे असल्याचे लक्षात येताच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत पुनिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.